पी एम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर! शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Fraud Message : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. पी एम किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचा समोर आलेले आहे. सध्या सोशल मीडिया द्वारे अनेक मेसेज सध्या व्हयरल होत आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. Pm Kisan Fraud Message

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व्या हप्त्याचे पैसे

पी एम किसान यादीचे थेट मेसेज सध्या व्हाट्सअप द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक झाल्यामुळे मोठे धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पी एम किसान डॉट Apk ची फाईल डाऊनलोड करताच अमरावती येथील 36 वर्षे युवकाच्या खात्यातून दोन कोटी 47 लाख 156 रुपये डेबिट झालेले आहेत. 22 ते 18 सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Pm Kisan Fraud Message

Apk नावाची फाईल प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी ती फाईल महत्त्वाची वाटल्याने ती फाईल ओपन करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल केली. काही वेळातच चोरट्याने त्याच्या मोबाईलवर ताबा मिळवून त्यांच्या खात्यातील दोन कोटी 47 लाख 156 रुपये परस्पर दुसऱ्याच्या खात्यावरती पाठवले. पण त्यांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली आणि त्यांनी 16 ऑक्टोबर रोजी आज्ञा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

दरम्यान मागील अनेक दिवसापासून व्हाट्सअप वरती pmkisan.apk व्हाट्सअप ग्रुप वर पाठवली जात आहे. प्रामुख्याने ज्या व्हाट्सअप ग्रुप वरती शेतकरी आहेत अशा ग्रुप वरती ही फाईल पाठवली जात आहे. या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही चेक करायचे सांगितले जात आहे. अनेक शेतकरी ही फाईल डाऊनलोड करत असल्याच्या घटना सध्या समोर येताना दिसत आहे.

त्याचबरोबर ऑनलाईन चोरट्याने चोरी करण्यासाठी नव्याने युक्ती शोधून काढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी अशा अज्ञात लिंक ओपन करू नये त्यामुळे आपण सतर्क करावी अशी देखील सांगण्यात आलेले आहे.

या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व्या हप्त्याचे पैसे

2 thoughts on “पी एम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर! शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन”

Leave a Comment

error: Content is protected !!