दहावीच्या परीक्षेत मोठा बदल! या दोन विषयांमध्ये 35 नाहीतर 20 गुण मिळवले तरी होणार पास


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Exam New Updates: महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेत महत्त्वाचा बदल केला आहे. या नवीन बदलामुळे विद्यार्थ्यांना दोन विषयांमध्ये 35 नाहीतर 20 गुण मिळवले तरी पास केले जाणार आहे. यामध्ये गणित आणि विज्ञान या विषयाची भीती असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये आता 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात या संबंधित तरतूद करण्यात आली आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर! बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा मोठा बदल

शाळेत असताना अनेक विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय खूप कठीण जातात. या विषयांमध्ये बोर्डांच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अगोदर 35 गुणाची आवश्यकता होती. मात्र नवीन नियमानुसार आता विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयात त पास होण्यासाठी 20 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. मात्र अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांच्या निकालावर एक विशेष शेरा देण्यात येणार आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर! बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा मोठा बदल

यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रमाणपत्र देऊन अकरावीत प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे असे दोन पर्याय उपलब्ध असतील. महाराष्ट्र बोर्डाच्या या नवीन नियमामुळे ज्या विद्यार्थ्यांना गणित किंवा विज्ञान या शाखेमध्ये करिअर करायचे नाही त्या विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे. असे विद्यार्थी या दोन विषयात कमी गुण मिळवून देखील त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील. SSC Exam New Updates

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक जाहीर! बारावीच्या परीक्षेमध्ये यंदा मोठा बदल

दहावीत गणित या विषयात कमी गुण मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ब्रेक लागतो. मात्र या बदलामुळे असे होणार नाही. विद्यार्थ्यांना इतर क्षेत्रात आपले शिक्षण सुरू ठेवता येणार आहे. दरम्यान शिक्षण आराखड्यातील या तरतुदीवर शिक्षण तज्ञाकडून अपेक्षा घेतला जात आहे. तसेच याचा विद्यार्थ्यांच्या बुद्धीच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “दहावीच्या परीक्षेत मोठा बदल! या दोन विषयांमध्ये 35 नाहीतर 20 गुण मिळवले तरी होणार पास”

Leave a Comment

error: Content is protected !!