Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील लाडकी बहीण योजना सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै पासून नोव्हेंबर या 5 महिन्याचे 7,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे.